Advertisement

हाय प्रोफाइल ड्रग्ज सप्लायरला अटक


हाय प्रोफाइल ड्रग्ज सप्लायरला अटक
SHARES
Advertisement

अमली पदार्थविरोधी पथकाने एका हाय प्रोफाइल तस्कराला अटक केली आहे. बकुल चंदेरीया (४४) असं या आरोपीचं नाव असून तो बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षातील सूत्रांनी दिली आहे. याआधी जुहू येथील ओखवूड ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांनी बकुल चंदेरीयाला अटक केली होती.साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

जवळपास महिन्याभरापासून ए. एन. सी. या चंदेरीयाच्या मागावर होती. चंदेरीयानं अमली पदार्थांच्या तस्करीला पुन्हा सुरुवात केल्याचं समजताच ए. एन. सी. त्याचा पाठलाग करत होती. बकुलकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याचं समजताच ए. एन. सी. च्या पथकानं शनिवारी रात्री त्याच्या खार येथील घरावर छापा टाकला. यावेळी ए. एन. सी.ने त्याच्याकडून साडे आठ लाख रुपये किंमतीचं 106 ग्राम कोकेन आणि एलएसडीचं 90 डॉट्स जप्त केले आहेत. एलएसडीची किंमत 4 लाखांच्या घरात असल्याचा दावा ए. एन. सी च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अमली पदार्थांसह चंदेरीयाकडून 2 लाख रोख असा एकूण साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

रविवारी चंदरीयाला कोर्टात हजर केलं असता त्याला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सेलिब्रिटी विश्वात बकुल प्रसिद्ध असून बड्या सेलिब्रिटी आणि मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये तो ड्रग्ज पुरवत असे.

संबंधित विषय
Advertisement