नेरूळमध्ये सराईत चोराला अटक

 Nerul
नेरूळमध्ये सराईत चोराला अटक

नेरुळ - लाॅटरी विक्रेत्याला गनचा धाक दाखवून फरार झालेल्या एका सराईत चोराला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. विनोद केदार असं या आरोपीचं नाव आहे. याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईतील नेरुळ परिसरात राहणाऱ्या एका लाॅटरी विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देत, त्याच्याकडून मोठ्या रखमेची लूट करत चार चोरट्यांनी पलायन केले होते. मात्र यातील काही संशयितांना पोलिसांनी यापूर्वीच पकडले. तर काही फरार चोर वांद्रे परिसरात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून संशयितांना अटक केली.

Loading Comments