SHARE

मालवणी - सराईत चोराला मालवणी पोलिसांनी अटक केलीय. मालवणीतल्या एका दुकानात मध्यरात्री चोरी करताना दुकानदारानं त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. यापूर्वीही त्यानं अनेक चोऱ्या केल्यात आणि तुरुंगाचीही हवा खालीय. मालवणी भागात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या होत होत्या. त्यामुळे तिथल्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण होतं. पण चोराला पोलिसांनी अटक केल्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या