कमला मिल आग: आरोपींच्या चुलत्यांना अटक आणि जामीन

आरोपींना फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी शनिवारी रात्री महेंद्रकुमार, राकेश आणि आदीत्य संघवी यांना अटक केली. हे तिघेही जण संघवी बंधूचे चुलते आहेत. मात्र रविवारी दुपारी हाॅलिडे कोर्टाने या तिघांची जामीनावर मुक्तता केल्याची माहिती पोलिस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली.

कमला मिल आग: आरोपींच्या चुलत्यांना अटक आणि जामीन
SHARES

कमला मिल कंपाऊंडच्या आगीतील फरार आरोपी ऱ्हतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानका यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरलेले असताना. या तिन्ही आरोपींना फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी शनिवारी रात्री महेंद्रकुमार, राकेश आणि आदीत्य संघवी यांना अटक केली. हे तिघेही जण संघवी बंधूचे चुलते आहेत. मात्र रविवारी दुपारी हाॅलिडे कोर्टाने या तिघांची जामीनावर मुक्तता केल्याची माहिती पोलिस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली.


आरोपींचा शोध सुरूच

कमला मिल कंपाऊंड परिसरातील इमारतीला आग लागल्या प्रकरणी पोलिस वन अबोव्ह पबचे मालक संघवी बंधू आणि अभिजीत मानकाचा यांचा शोघ घेत आहेत. मात्र हे तिघेही हाती येत नसल्याने ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी माझगावच्या चैत्य टॅावरमध्ये रहात असलेल्या संघवी बंधूच्या घरी धाड टाकली. मात्र येथूनही दोन्ही आरोपींना पळ काढल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घरातल्यांचा जबाब नोंदवून घेतला.


आरोपी पुण्याला पळाले?

दरम्यान, हे तिन्ही आरोपी पुण्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांची ५ पथकं त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली. सोबतच या प्रकरणाचा तपास करताना महेंद्रकुमार, राकेश आणि आदीत्य संघवी या तिघांनी आरोपी संघवी बंधूला पळून जाण्यास मदत केल्याचं पुढे आलं. त्यानुसार भायखळा पोलिसांनी तिघांवर २१६ अंतर्गत गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. या तिघांना किल्ला कोर्टातील हाॅलिडे कोर्टात हजर केलं असता. कोर्टाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. तिन्ही आरोपींना अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

'वन अबव्ह', 'मोजोस बिस्ट्रो' आणि 'पी22'वर दुसरा गुन्हा

पब मालक फरार... लूक आऊट नोटीस जारी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा