पीटर आणि इंद्राणी मुखर्जीच्या घरावर सीबीआयचे छापे


पीटर आणि इंद्राणी मुखर्जीच्या घरावर सीबीआयचे छापे
SHARES

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्या चेन्नई येथील घरासह मंगळवारी सीबीआयच्या टीमने 'आयएनएक्स मीडिया'चे संस्थापक पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मुंबईतील घरावर छापे मारले. मंगळवारी देशभरातील एकूण 17 ठिकाणी सीबीआयने छापे मारले. या प्रकरणी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती सीबीआयतर्फे देण्यात आली नाही. शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर आणि इंद्राणी हे दोघेही सध्या जेलमध्ये आहेत.

'आयएनएक्स मीडिया' या कंपनीला लाच घेऊन मंजुरी दिल्याचा आरोप कार्ती यांच्यावर असून याच प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 'आयएनएक्स मीडिया' या कंपनीला ज्या 'एफआयपीबी' (Foreign Investment Promotion Board ) द्वारे मंजुरी देण्यात आली होती. तो विभाग अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येत असून त्यावेळी चिदंबरम हे अर्थमंत्री होते. सोमवारी या प्रकरणी सीबीआयने कार्तीसह इंद्राणी आणि पीटर मुखर्जी विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा