शिवडीत एकाच दिवशी चार घरफोड्या

 Shivadi
शिवडीत एकाच दिवशी चार घरफोड्या

शिवडी - पश्चिम येथील बीडीडी चाळीत बुधवारी पहाटे चार ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी तब्बल 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी शिवडी क्रॉस रोड येथील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरोधात कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडीडी चाळ क्रमांक 9 मध्ये राहणाऱ्या एका रहिवाशांची दोन घरे आहेत. त्याच्या एका घरातील कपाटातून चार तोळे सोने आणि 60 हजार रुपयांची चोरी केली. तर दुसऱ्या एका घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपयांची चोरी केली. त्याच इमारतीत आणखी एका घराच्या दरवाजाची कडी तोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. 

तर इमारत क्रमांक 11 मधील एका घरातून दोन लॅपटॉपची चोरी झाली आहे. घरफोडीनंतर स्थनिकांनी इमारत परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली तेव्हा चोर चाळीत फिरत असल्याचे निदर्शनास आले असून येथील स्थानिकांनी हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासणीसाठी दिले आहे.

Loading Comments