9 व्या माळ्यावरून पडून सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

Malad West
9 व्या माळ्यावरून पडून सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
9 व्या माळ्यावरून पडून सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
See all
मुंबई  -  

मालाड परिसरात रेस्टॉरंटच्या 9 व्या माळ्यावरून पडून एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. सुभाष असे मृत पावलेल्या इसमाचे नाव असून, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची तक्रार दाखल केली आहे.

 ज्या रेस्टॉरंटमध्ये ही दुर्घटना घडली त्या रेस्टॉरंटचे नाव क्यूबा रेस्टॉरंट असून ते सिनर्जी नावाच्या कमर्शियल इमारतीच्या 9 व्या मजल्यावर आहे. सुभाष हा या रेस्टॉरंटमध्ये सफाईचे काम करत असे. शुक्रवारी काम करत असताना सुभाषचा अचानक पाय घसरला आणि तो तो खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांनी ही घटना त्याच्या कुटुंबाला देखील दाखवली. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.