Advertisement

डस्टबिनमध्ये सापडलं 70 लाखांचं सोनं


डस्टबिनमध्ये सापडलं 70 लाखांचं सोनं
SHARES
Advertisement

मुंबई विमानतळावर डस्टबिनमध्ये 70 लाखांचे सोने सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवळपास 2 किलो 355 ग्रॅम वजनाचे हे सोने कन्वेयर बेल्ट क्रमांक 5 शेजारील पुरुष स्वच्छ्ता गृहातील डस्टबिनमधून जप्त करण्यात आले आहे. यामध्ये सव्वा किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि उर्वरित एक किलो सोन्याची बिस्किटं सापडल्याचे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी कस्टम विभागाने अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आहे. स्मगलिंगच्या उद्देशाने हे सोनं भारतात आणण्यात आलं असून, कस्टमचा चोख पहारा बघता पकडलं जाण्याच्या भीतीने सोनं कचरापेटीत टाकण्यात आल्याचा दावा कस्टमने केला आहे.

संबंधित विषय
Advertisement