संशयावरून पतीने घेतला पत्नीचा जीव

 Ghatkopar
संशयावरून पतीने घेतला पत्नीचा जीव

पत्नीचे दुसऱ्या इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून घाटकोपरमध्ये एका पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. सोहील शेख (26) असे या आरोपीचे नाव असून, तो पत्नी सायमा शेख (22) हिच्यासह घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरातील कोकण वैभव चाळीत राहत होता. 

पत्नीचे एका इसमाशी अनैतिक संबध असल्याचा संशय या सोहीलला होता. याच संशयावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणे देखील झाली होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्याचे पत्नीसोबत याच कारणावरून पुन्हा भांडण झाले होते. याच रागातून त्याने पत्नीला घराच्या बाजूलाच असलेल्या खाडीलगत नेऊन तिच्या डोक्यावर प्रहार करत तिची हत्या केली. पंतनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेत तो राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या सोहेल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Loading Comments