बायकोचे न्यूड फोटो सासऱ्याला पाठवले, विक्षिप्त नवऱ्याला अटक


बायकोचे न्यूड फोटो सासऱ्याला पाठवले, विक्षिप्त नवऱ्याला अटक
SHARES

बायको माहेरी गेल्यावर तिला परत पाठवण्यासाठी सासु-सासऱ्यांना विनवणी करणारे असंख्य नवरे आपल्या आजूबाजूृला आढळून येतात. पण बायकोला परत पाठवा म्हणून चक्क आपल्या सासऱ्यालाच पत्नीचेच न्यूड फोटो पाठवण्याचा प्रकार करणाऱ्याला एका विक्षिप्त नवऱ्याला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे.


बायकोसाठी सासऱ्याला धमकी

मस्जिद बंदर परिसरात राहणाऱ्या तरुणीचे काही वर्षांपूर्वी अारोपी इरफान रफिक मलोन यांच्याशी लग्न झाले होते. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाल्यामुळे पीडित महिला इरफानला सोडून पाच महिन्यांपूर्वी तिच्या माहेरी रहायला आली होती. आपल्या रुसलेल्या पत्नीला मनवण्याचे सोडून इरफानने नवीन मोबाइल नंबरहून सासऱ्यांना धमकवण्यास सुरूवात केली. मुलीला सासरी पाठवा अन्यथा तिचे न्यूड फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी त्याने सुरूवातीला दिली.

 सासऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने इरफानने सासऱ्यांच्या मोबाइलवर पत्नीचे न्यूड फोटो पाठवले. त्यानंतरही इरफान वारंवार ओळख लपवून त्रास देऊ लागल्याने त्याच्या सासऱ्यांनी पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पायधुनी पोलिसांनी त्रास देणाऱ्या त्या नंबरचा माग काढला असता तो नंबर इरफानचा असल्याचे निदर्शनास अाले.  या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी इरफानला अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

भायखळ्यात स्लॅब कोसळून महिला जखमी

गुरू साटमचे ५ हस्तक जेरबंद




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा