फुटपाथवर कार विक्रेत्यांचा कब्जा

 Chembur
फुटपाथवर कार विक्रेत्यांचा कब्जा

चेंबूर - येथील अनेक मुख्य रस्त्यांलगतच्या फुटपाथवर काही जुन्या कार विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणण्यात आलेल्या जुन्या कार येथे उभ्या केल्या जात आहेत.

या अनधिकृत पार्कींगकडे वाहतूक पोलीस मात्र कानाडोळा करत आहेत. त्यामुळे रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. चेंबूरमधील सायन-पनवेल रोडवर सर्वाधिक जुने कार विक्रेते आहेत. पूर्वी हे कारविक्रेते त्यांच्या दुकानासमोरच चार ते पाच कार लावत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कार चालकांचा धंदा तेजीत असल्याने त्यांनी वाहतूक पोलिसांना हाताशी धरून रस्त्यालगत कार विक्रीसाठी उभ्या करायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर या कार विक्रेत्यांनी संपूर्ण फुटपाथ अडवून त्यावर कार विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे हे फुटपाथ पादचाऱ्यांसाठी बनवण्यात आले आहेत की कार विक्रेत्यांसाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Loading Comments