बनावट टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश

आरोपीकडून भारतातील अग्रगण्य कंपन्यावोडाफोन, आयडीया, एअरटेल कंपनींचे आणि भारत सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बनावट टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश
SHARES

जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल अधिकृत दूरसंचार प्रणालीचा वापर न करता संबंधित व्यक्तीशी जोडून सरकारचे कोट्यवधींचे नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा मुंबईच्या गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी केरळहून हिलर मोहम्मद कुट्टी (३४) याला अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे ८०० सिमकार्ड आणि एक्सचेंज चालविण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहे.

 हेही वाचाः- राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार! पोलिसांना मिळणार १० हजार घरं


बहरीन, कतार, यूएई, कुवेत या आखाती देशांसह जगातील इतर भागांतून येणारे कॉल्स बेकायदा एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जात असल्याची माहिती  गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. सिमबॉक्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हरवर घेऊन हे कॉल संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्याची नोंदही होत नव्हती. त्यामुळे या माध्यमाचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाण्याचा धोका असल्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची चार पथके तयार करण्यात आली. या पथकांनी केरळ नवी दिल्लीतील नोएडा या ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये हिलर मोहम्मद कुट्टीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३२ स्लाॅट असलेला सीमकार्ड बाॅ्क्स, १२८ स्लाॅट असलेले ५ सीम बाॅक्स,३ लॅपटाॅप, १ यूपीएस,१ राऊटर, १ माॅडेम व इतर साहित्य जप्त केले आहेत.   

याद्वारे आरोपीकडून भारतातील अग्रगण्यकंपन्या वोडाफोन, आयडीया, एअरटेल कंपनींचे आणि भारत सरकारचे  कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे बेकायदा एक्सचेंज सुरू असल्याचे सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितले. या प्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात  कलम ४१९ ४२०, ४६५ ४६८, ४७१, ४२०(ब), १२० (ब) भादवी सह भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ कलम ०४, २०, २५ सह कलम ०३, ०६ इंडियन वायरलेस टेलिग्राफ अॅक्ट १९३३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत. 

 हेही वाचाः- CAA विरोधात बोलला, उबेर चालक थेट घेऊन गेला पोलीस ठाण्यात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा