बनावट दारूचं रॅकेट उद्ध्वस्त

 Lower Parel
बनावट दारूचं रॅकेट उद्ध्वस्त
बनावट दारूचं रॅकेट उद्ध्वस्त
See all

लोअर परळ - ना.म.जोशी मार्गावरील मोगल हाउस 379/ए या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रिकाम्या बाटल्यांतून नकली स्कॉचची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यातून हा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी स्कॉच खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडण्यात आलंय. तसंच दोन कार, 49 विविध ब्रॅंडच्या 563 बाटल्या, इंपोर्टेड बिअरच्या 192 बाटल्या असा 20,31,185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतला मुख्य आरोपी चंद्रा क्कातील फरार आहे. या बाटल्यांतून नाताळ आणि नववर्षासाठी होणाऱ्या कार्यक्रमांना नकली दारूची पुरवली जाणार होती, अशी माहिती निरीक्षक संदीप मोरे यांनी दिली आहे. बीजू तीय, अतीशकुमार मोहनदास, सुमीत बेहल, तरविंदर सिंह अशी अन्य आरोपींची नावं आहेत.

Loading Comments