विकृतीचा कळस, वाकोल्यात मनिपूरी तरुणीच्या अंगावर थूंकल्याची घटना


विकृतीचा कळस, वाकोल्यात मनिपूरी तरुणीच्या अंगावर थूंकल्याची घटना
SHARES
मुंबईत विकृतीपणाचा कळस वाटावा अशी एक घटना समोर आली आहे. वाकोला परिसरात राहणाऱ्या़ मणिपूरच्या तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीनं गुटखा थुंकून तिला हिणवण्याचा प्रकार घटला आहे. तरुणीसोबत झालेल्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या प्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सगळे एकजुट होत आहेत. या व्हायरसनं देशातही हाहाकार माजवला आहे. जर आता यावर वेळेत नियंत्रण ठेवले नाही तर प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते. याच दरम्यान लोक एकमेकांना मदत करताना दिसले. पण काही लोकं असेही आहेत जे या महामारीच्या स्थितीही लज्जास्पद कृत्य करत आहेत.  मुंबईत अशीच एक घटना घडली आहे. वाकोला परिसरात राहणारी मणिपूरच्या तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीनं गुटखा थुंकला आणि तिला कोरोना म्हटलं. तरुणीसोबत झालेल्या या लज्जास्पद घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 868 ओलांडली आहे. याव्यतिरिक्त, मृतांची संख्याही 52 झाली आहे.  भारतातील अनेक राज्ये पूर्णपणे बंद केलीत. हा व्हायरस थांबविण्यासाठी कित्येक पावले उचलली जाताहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एका तरुणीसोबत झालेल्या लज्जास्पद घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना  सोमवारी राञी झाल्याचे कळते. मूळात या भागात अनेक मनिपूरी नागरिक वस्तीला आहे.  मनिपूरी नागरिकांचे आणि चीनच्या नागरिकांचे चेहरे हे जवळपास सारखे दिसतात. या पूर्वी हि दिल्लीत असाच एक प्रकार मनिपूरी तरुणीसोबत घडला होता. दरम्यान मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे मनिपूरी तरुणीने वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी 270, 352 भा.द.वि कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस रस्त्यावरील सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.


संबंधित विषय