लव्ह- सेक्स- धोका... , तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबध ठेवले होते. काही महिने उलटल्यानंतर पीडित तरुणीने करणजवळ लग्नासाठी तगादा लावला.

लव्ह- सेक्स- धोका... , तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
SHARES

लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत, तिच्याशी शारिरीक संबध ठेवून ऐनवेळी तिला लग्नासाठी धोका दिल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. प्रियकराने केलेला विश्वासघात आणि लग्नासाठी दिलेला नकार तरुणीला सहन न झाल्याने २० वर्षीय तरुणीने गळफास घेत स्वतःला संपवले आहे . या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तरुणासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः- Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

घाटकोपर परिसरात पीडित २० वर्षीय तरुणी  तिच्या मावशीजवळ रहायला आली  होती.  काही दिवसांपूर्वी तिची ओळख करण परीहार याच्याशी झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबध होते. अशातच करणने तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबध ठेवले होते. काही महिने उलटल्यानंतर पीडित तरुणीने करणजवळ लग्नासाठी तगादा लावला. मात्र वेगवेगळी कारणं सांगून करण तिला टाळत होता.  अचानक एके दिवशी करणने तरुणीला लग्नास नकार दिला. तसेच तिच्याशी बातचीत ही बंद केली.  त्यामुळे तरुणी मानसिक तणावाखाली  गेली होती.  हीबाब तिने करणचा भाऊ तेजस परीहार याला ही सांगून करणला समजवण्यास सांगितले. मात्र तेजसने तरुणीलाच करणचा नाद सोडण्यास सांगितले.  ऐवढ्यावरच न थांबता त्याने याबाबत कुठेही वाच्चता  न करण्यास धमकावले. पोलिसात तक्रार करून काहीही होणार नाही माझी ओळख वरपर्यंत असून पोलिसात तक्रार केल्यास परिणान वाईट होतील अशी धमकी दिली होती.  

हेही वाचाः- डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणी हवालदिल झाली. नैराक्षेतून तिने मावशीच्याच घरी शुक्रवारी  आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी पीडित मुलीने सुसाईड नोट मिळाली. त्यातून हा सर्व प्रकार पुढे आला. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी करण परीहार आणि तेजस परीहार या दोघांविरोधात ३०६, ३७६, ४२०, ५०६, ३४ भा.द. वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा