भारत बंद ! मुंबईत आंदोलन शांततेत, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

पोलिसांच्या सतर्क आणि चोख बंदोबस्तामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

भारत बंद !  मुंबईत आंदोलन शांततेत, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
SHARES

देशात कृषी कायद्या विरोधात मंगळवारी भारत बंदची हाक दिल्यानंतर विविध राजकिय पक्षांनी केंद्राच्या या विधेयकाचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मुंबईत ठिक ठिकाणी राजकिय नेत्यांनी आंदोलनं करत रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्क आणि चोख बंदोबस्तामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

मुंबईत भारत बंदच्या पार्श्वभूमिवर शहरात अतिरिक्त पोलिसांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय शहरातील ९४ पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यातील महत्वाचे रोड आणि ठिकाणांवर वाढीव पोलिस कुमक ठेवली होती. आंदोलकांकडून  निवेदन स्विकारणे, एकाच जागेवर निदर्शने करण्यास पोलिसांकडून परवानी दिली जात होती. भारत बंदच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी ६०० पोलिस जादा तैनात केले होते.तर १२सीआरपीएफच्या तुकड्याही बोलण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर मुंबईत लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मुख्य नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले होते.

हेही वाचाः- बनावट नोटांची छपाई पाकच्या टाकसाळीत, चेंबूरमधून माजी नगरसेविकेच्या नवऱ्याला अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा