धुलिवंदनाला गालबोट, फुगा मारल्यानं सायकलस्वाराचा मृत्यू

बाईकस्वाराचा धक्का शेजारुन येणाऱ्या सायकलस्वाराला लागला

धुलिवंदनाला गालबोट, फुगा मारल्यानं सायकलस्वाराचा मृत्यू
SHARES

विरारमध्ये होळीच्या दिवशी फुगा मारल्यानं सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रस्त्यानं जाणाऱ्या ट्रकमधील तरुणांनी बाईकस्वाराच्या दिशेनं रंग आणि पाण्यांनी भरलेला फुगा मारला. मात्र हा फुगा लागून गडबडलेल्या दुचाकीस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला.

बाईकस्वाराचा धक्का शेजारुन येणाऱ्या सायकलस्वाराला लागला. यामध्ये सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ऐन होळीच्या दिवशी समोर आली आहे. मुंबईजवळच्या विरार पश्चिम पुरापाडा परिसरात ही घटना घडली आहे.

रामचंद्र पटेल असे मृत्यू झालेल्या सायकल स्वाराचं नाव आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोटारसायकल चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सायकलस्वार हा अर्नाळावरून विरारच्या दिशेने येत होता. तेवढ्यात अर्नाळा किल्ला इथला तरुण भरधाव वेगात मोटारसायकलवर अर्नाळाच्या दिशेनं जाताना पुरापाडा या ठिकाणी त्यानं सायकल स्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.



हेही वाचा

होळीनंतर मुंबईच्या तापमानात वाढ होणार

कटिंग महागला! चहाच्या किंमतीत २ रुपयांची वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा