Advertisement

कटिंग महागला! चहाच्या किंमतीत २ रुपयांची वाढ

दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आला आहे.

कटिंग महागला! चहाच्या किंमतीत २ रुपयांची वाढ
SHARES

मागील काही दिवसांपासून महागाई वाढत असल्याचे दिसत होते. दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आला आहे. असं वृत्त एबीपीनं दिलं आहे.  

चहा आता दोन रुपयांनी महागणार आहे. टी कॉफी असोसिएशनच्यावतीनं राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साखर, दूध, चहापावडर यांचे भाव वाढल्यानं चहाचे दर ही वाढले आहेत. काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर इतकी दरवाढ करण्यात आली होती.

त्याशिवाय चहासाठी आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूंच्या दरात वाढ होत असल्यानं चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित जमवणं अधिक कठीण होत होतं.

चहा विक्रेत्यांची संघटना असलेल्या टी कॉफी असोसिएशनच्यावतीनं चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साधारणपणे ६ रुपयांना मिळणारा चहा आता ८ रुपयांना मिळेल. तर काही ठिकाणी १० रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता १२ रुपयांना मिळणार आहे.

वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दूध उत्पादक महासंघ, कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर दूधामागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली.

महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल, मदर डेअरी आदींनी दूधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ केली आहे.

चहासोबतच कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये ३ ते ७ टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत ३ ते ४ टक्के वाढ झाली आहे.

नेस्ले इंडियाच्या A+milk च्या एक लीटर वाल्या पाकिटाची किंमत ४ टक्केंनी वाढली आहे. त्यामुळे या पाकिटाची किंमत ७८ रुपये झाली आहे. याआधी हे पाकिट ७५ रुपयांना मिळत होते.

नेस्कॅफे क्लासिकच्या २५ ग्रॅम वाल्या पाकिटाची किंमत २.५ टक्केंनी वाढून ८० रुपयांना झाली आहे. याची किंमत आधी ७८ रुपये होती.



हेही वाचा

महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या दरात 'इतकी' वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा