Advertisement

होळीनंतर मुंबईच्या तापमानात वाढ होणार

होळीनंतर मुंबईच्या तापमानात पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

होळीनंतर मुंबईच्या तापमानात वाढ होणार
SHARES

कोकणात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या आठवड्याभरापासून मुंबईचे कमाल तापमान सातत्यानं ३७ ते ३९ अंशादरम्यान नोंदवण्यात येत आहे.

होळीनंतर मुंबईच्या तापमानात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकर आणखी हैराण होणार यात काही शंका नाही.

बुधवारीदेखील मुंबापुरीचे कमाल तापमान ३७.५ अंश नोंदवण्यात आले होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेनं मुंबईच्या कमाल तापमानात सातत्यानं भर घातली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील तापमान ४० ते ४२ अंशाच्या आसपास आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात बहुतांश शहरांचे विशेषतः कोकणातील अनेक शहरांचे कमाल तापमान ३८ ते ३९ अंशादरम्यान नोंदविण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबईतील दोन्ही वेधशाळांनी बुधवारी, १६ मार्च आणि गुरुवार, १७ मार्च रोजी कमाल तापमानात किंचितशी घट नोंदवली आहे. तज्ञांनी सुचवलं आहे की, शहरातील उष्णतेच्या लाटांची तीव्रता कमी झाली आहे.

१७ मार्च, सांताक्रूझ इथं दिवसाचे कमाल तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी ३७.५ अंश सेल्सिअसवर राहिले. बुधवारी देखील इतकिच नोंद करण्यात आली होती. तर, कुलाबा इथं ३३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर १६ मार्चला याच परिसरात ३४.८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, रात्रीचे किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहिले. IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेत, किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंश जास्त होते.

गेल्या वर्षी, २९ मार्च रोजी सर्वाधिक किमान तापमान २४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. गेल्या दशकात मार्चमधील सर्वोच्च किमान तापमान २०२० मध्ये २६ अंश सेल्सिअस होते.

तर १७ मार्च, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले. 

पुणे (१६.८), सातारा (१८.७), मराठवाडा (१९.६), अहमदनगर (१८), नाशिक (१८.८), बारामती (१६.५) इथं तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले. 



हेही वाचा

मुंबईला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा