महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर आयकर विभागाची छापेमारी

जानेवारी महिन्याच्या २५ तारखेला मुंबई महानगरपालिकेतील एक प्रमुख व्यक्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी आणि काही कंत्राटदारांवर प्राप्तिकर विभागाने जप्तीची कारवाई केली आहे.

महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर आयकर विभागाची छापेमारी
SHARES

महापालिकेतील अनेक बड्या अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर प्राप्तिकर विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. जानेवारी महिन्याच्या २५ तारखेला मुंबई महानगरपालिकेतील एक प्रमुख व्यक्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी आणि काही कंत्राटदारांवर प्राप्तिकर विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत आतपर्यंत मुंबईतील एकूण ३५ हून अधिक परिसरात छापेमारी करण्यात आली आहे.

शोध मोहिमेदरम्यान गैरव्यवहाराची अनेक कागदपत्रे, पत्रके आणि डिजिटल पुरावे सापडले आहेत आणि जप्त करण्यात आले आहेत. हे जप्त केलेले पुरावे हे कंत्राटदार आणि त्या व्यक्ती यांच्यातील जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट करतात. या ३० पेक्षा अधिक स्थावर मालमत्तांची किंमत १३० कोटीपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज आहे.

यामध्ये त्यांच्या नावावर, त्यांचे सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि अवैधरित्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवल्याचे पुरावेही सापडले आहेत. 

अनेक कोटींच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली पत्रके आणि फाईल्स सापडल्या असून त्या जप्त केल्या गेल्या आहेत, ज्यांची नोंद खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये केली गेली नाही.

कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून त्यांचा खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात लपवण्यात आल्याचं समोर आलंय. या संस्थांकडून रोख रक्कम काढण्यात आली आहे आणि त्याचा वापर करारनामे देण्यासाठी आणि मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी देयके मिळवण्यासाठी केला गेला आहे.

या गैरप्रकाराच्या माध्यमातून कंत्राटदारांनी तब्बल २०० कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या शोध मोहिमेदरम्यान अघोषित २ कोटी रुपये रोख रक्कम आणि दीड कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा