अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकरचे छापे

आयकर विभागाने बुधवारी दुपारी फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर धाडी टाकल्या.

अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकरचे छापे
SHARES

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले. अनुराग आणि तापसी यांच्याबरोबरच विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकले आहेत. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले आहेत. 

आयकर विभागाने बुधवारी दुपारी फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर धाडी टाकल्या. मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. मुंबईतील २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. 

कर चोरी केल्याप्रकरणी फँटम फिल्म आणि क्वान या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे.  फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११ मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा