काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांची विशेष मोहिम

गंभीर गुन्ह्याच्या या घटनांमध्ये गुन्हेगारांकडून ‘काळी फिल्म’ वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा वापर होण्याची शक्यता अधिक असते.

काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांची विशेष मोहिम
SHARES

काळ्या काचा असणाऱ्या वाहनांविरोधात मुंबईच्या वाहतूक विभागाने विशेष मोहिम सुरू केली आहे.  कायदा अस्तित्वात असताना आता सर्वोच्च न्यायालयाने नवीन काही सूचना केल्याने कारवाईस अधिक वेग आला आहे. शहर वाहतूक शाखेने अशा वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून आठवड्याभरात वाहतूक पोलिसांनी शहरात १८८२ वाहनांवर कारवाई केली आहे.

हेही वाचाः- महिलांना लोकल प्रवास: रेल्वेला राज्य सरकारच्या उत्तराची प्रतिक्षा


‘काळी फिल्म’ बसविण्यात आलेल्या वाहनधारकांविरोधात आतापर्यंत कारवाई करताना पोलिसांना कायद्यातील पळवाटांचा अडथळा येत होता. त्यामुळे कारवाईचे हे प्रमाण अत्यल्पच होते. शहरातील अनेक वाहनधारकांकडून काचांवर वेगवेगळ्या प्रकारच्या काळी फिल्म बसविण्यात आली आहे. या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत  होती. अशा वाहनधारकांविरूध्द मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरूवात केली. वाहनांची काच ही पारदर्शक असणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही तीव्रतेची ‘काळी फिल्म’ वाहनांवर बसविणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही सरास अनेक जण बिनदिक्कत वाहनांना काळी काच त्यावर लोकप्रतिनिधींची स्टिकर तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरायचे.

हेही वाचाः- केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

या सर्वांविरोधात वाहतूक पोलिसांनी १२ आँक्टोंबर ते १८ आँक्टोंबर दरम्यान एक विशेष मोहिमेंतर्गत कारवाई करण्यास सुरूवात केली. या कारवाई दरम्यान वाहनांना काळ्या काचा लावून बिनदिक्कत फिरणाऱ्या १८८२ गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. काही लोकप्रतिनिधींनाही पोलिसांच्या या कारवाईला सामोरे जावे लागल्याचे सांगितले जाते.  गंभीर गुन्ह्याच्या या घटनांमध्ये गुन्हेगारांकडून ‘काळी फिल्म’ वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा वापर होण्याची शक्यता अधिक असते.  त्यामुळे या वाहनांवर धडक कारवाई केली जात आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा