..आणि रस्त्यावर उभी कार अचानक पेटली!

ठाणे - तुम्ही तुमच्या कारमध्ये बसला आहात आणि जर तुमची कार अचानक पेटली तर? भीती वाटली ना? पण हे होऊ शकतं. शुक्रवारी दुपारी ठाण्यात जकात नाक्याजवळ एका इंडिका कारने असाच अचानक पेट घेतला.

दुपारी 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. इंडिका एम.एच.ई.डी -8574 या कारने अचानक पेट घेतला आणि एकच खळबळ उडाली. ही आग एवढी मोठी होती की गाडी पूर्णत: जळून खाक झाली.

दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. गाडीतील सीएनजी टँकमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Loading Comments