तुरुंगात आरोपीची आत्महत्या

  Pali Hill
  तुरुंगात आरोपीची आत्महत्या
  मुंबई  -  

  वांद्रे - फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या ३० वर्षीय आरोपीनं पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केलीय. चंद्रशेखर रामपाल यादव असं आरोपीचं नाव आहे. वाकोला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चंद्रशेखर यादवला २० ऑक्टोबरला अटक केली होती. न्यायालयानं त्याला २४ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार वाकोला पोलिसांनी गुरूवारी त्याची रवानगी वांद्रे पोलीस कोठडीत केली. शुक्रवारी दुपारी चंद्रशेखर आंघोळीला जायच्या बहाण्यानं बाथरूममध्ये गेला. पण बराचवेळ बाहेर आलाच नाही. त्यामुळे पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा उघडून बघितलं असता चंद्रशेखरनं गळफास लावून घेतलेला आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.