नीरव मोदीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस


नीरव मोदीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस
SHARES

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील अारोपी नीरव मोदी विरोधात अांतरराष्ट्रीय तपाय यंत्रणा इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली अाहे.  भारताच्या शिफारशीनंतर इंटरपोलने नोटीस जारी केली. त्यामुळे अाता नीरव मोदी जगातील कोणत्याही विमानतळावर दिसल्यास त्याला तात्काळ अटक केली जाणार अाहे.


नीरव मोदी लंडनमध्ये

काही दिवसांपूर्वी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास पीएमएलए कोर्टाने हिरवा कंदील दिला होता. कोर्टाने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी महासंचालनालयाचा (ईडी) अर्ज मंजूर केला अाहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असल्याचं बोललं जात अाहे.


अनेक देशांना प्रत्यार्पणासाठी विनंती

इंटरपोलच्या अंतर्गत एकूण १९२ देश येतात. जर नीरव मोदीला अटक केली तर त्याला भारतात अाणणे सोपे होणार अाहे. मात्र, नीरव मोदी कोणत्या देशात अाहे अाणि त्या देशाशी भारताचे कसे संबंध अाहेत त्यावरही हे अवलंबून अाहे. भारताने अनेक देशांना नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली अाहे. कारण नीरव मोदी अापले ठिकाण सारखे बदलत अाहे.



हेही वाचा - 

अंकित तिवारीच्या वडिलांना मारलं, कांबळीच्या पत्नीवर गुन्हा दाखल

मुंबईला फिरायला आलेल्या इटालियन महिलेवर बलात्कार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा