COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

फोन टॅपिंग प्रकरण, रश्मी शुक्ला यांना पुन्हा समन्स

याआधीही रश्मी शुक्ला यांना सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना २८ तारखेला रश्मी शुक्लांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.

फोन टॅपिंग प्रकरण, रश्मी शुक्ला यांना पुन्हा समन्स
SHARES

मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सायबर पोलिसांकडून पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. शुक्ला यांना ३ मे पर्यंत मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. गुप्तचर विभागाच्या प्रमुख  असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. 

याआधीही रश्मी शुक्ला यांना सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना २८ तारखेला रश्मी शुक्लांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.  मात्र,  रश्मी शुक्ला यांनी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी हैदराबादहून मुंबईत येणे शक्य नसल्याचे सायबर पोलिसांना ईमेलद्वारे कळविले. तपास अधिकारी प्रश्न पाठवू शकतात. त्या प्रश्नांची उत्तरे ईमेलद्वारे पाठवेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं  आहे.  मात्र, आता पुन्हा एकदा सायबर पोलिसांनी त्यांना समन्स बजावलं आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरापूर्वी पोलीस बदल्यासंदर्भात घोटाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांमध्ये वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा उल्लेख केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. एवढंच नाहीतर याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले.हेही वाचा -

कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार - किशोरी पेडणेकर

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा