अपघात करून पळ काढणाऱ्या ट्रक चालकाला अटक


अपघात करून पळ काढणाऱ्या ट्रक चालकाला अटक
SHARES

बेदरकारपणे वाहन चालवत एका 60 वर्षीय इसमाला गंभीररित्या जखमी करून पळ काढणारा ट्रक चालक ब्रम्हजीत रामपाल सिंग याला शिवडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रम्हजीत सिंग 12 मे रोजी सायंकाळी रे रोड वरून शिवडीच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक घेऊन येत होता. मात्र या ठिकाणी त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट दारुखाना बीपीटी रोड वरील पोल क्र. 44 वर आदळला. त्याचवेळेस तेथून सायकलवरून प्रवास करणारे राम चौधरी (वय - 60) जात होते. ट्रक चौधरी यांच्या सायकलला देखील येऊन धडकला. या घटनेत चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याऐवजी ब्रम्हजीत रामपाल सिंग याने घटनास्थळवरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चौधरी यांना केईएम रुग्णालयात दाखल केले.

बेदरकारपणे वाहन चालवून पळ काढणाऱ्या चालक ब्रम्हजीत सिंग याच्या मागावर गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या शिवडी पोलिसांना अखेर एका सूत्रांकडून सिंग याची माहिती मिळाली. त्यानुसार शिवडी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर 279 व 338 या कलामांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे शिवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नावगे यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा