नोटाबंदीमुळे भ्रष्टाचारात घट

 Pali Hill
नोटाबंदीमुळे भ्रष्टाचारात घट

मुंबई - मोदी सरकारच्या 1000-500 रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याचे दिसते आहे. लाचलुचपत विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढला जात आहे. नोटाबंदीच्या काळात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लाच घेण्याच्या प्रमाणात 35 टक्क्यांनी घट झाल्याचं लाचलुचपत विभागाने सांगितले. राज्यात 2015 मध्ये नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान लाच मागितल्याच्या 184 गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र 2016 मध्ये नोव्हेंबर,डिसेंबर दरम्यान लाच मागितल्याचे 120 गुन्हेच दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण हाच आधार मानून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटाबंदीने भ्रष्टाचारात घट झाल्याचे सांगितले. दरवर्षीप्रमाणे राज्याच्या महसूल विभागात 2016 मध्येही सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. महसूल विभागाच्या खालोखाल एमएमआरडीए, पोलीस, पंचायत समिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2016 मध्ये 223 अधिकारी, 224 पोलीस, 109 पंचायत समित्या, एमएमआरडीएचे 52 अधिकारी यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल केले. राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे पुण्यात झाली असून, मुंबईत सर्वात कमी 66 भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

Loading Comments