मुंबईवर इसिस करणार हल्ला, विमानतळाच्या स्वच्छतागृहात सापडली धमकीची चिठ्ठी


मुंबईवर इसिस करणार हल्ला, विमानतळाच्या स्वच्छतागृहात सापडली धमकीची चिठ्ठी
SHARES

मुंबई विमानतळाच्या स्वच्छतागृहात हल्ल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली आहे. सध्या 'सीआयएसएफ'सह सहार पोलीस आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं असून संपूर्ण कार्गो विभाग आणि विमानतळाच्या परिसराची कसून तपासणी केली जात आहे.


कधी मिळाली धमकी?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो विभागाच्या स्वछतागृहात सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास एक चुरगळलेला कागद सापडला. या कागदावर इसिस २६ जानेवारी २०१८ ला मुंबईवर हल्ला करणार असल्याची धमकी लिहिलेली होती.


तपास सुरू

हा कागद वाचून 'सीआयएसएफ'ने संपूर्ण कार्गो टर्मिनलमधून प्रवाशांसह सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. त्यानंतर श्वान पथक बोलावून सगळ्या विमानतळ परिसराची तपासणी सुरू केली. विमानतळ परिसर आणि कार्गो विभागातील कर्मचाऱ्यांना कडक तपासणीनंतरच आत सोडण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा