वृद्ध आंबटशौकिनाला छुपी फोटोग्राफी पडली महागात


SHARES

पोटासाठी दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईतील अनेक महिला आणि युवतींना काही आंबटशौकिनांचा त्रास सहन करावा लागतो. यापैकी बहुतेक आंबटशौकिन तरुण किंवा मध्यमवयीन गटातील पुरुष असतात. मात्र अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडियोत एका वृद्ध रंगेल आंबटशौकिनाला समोरच्या बाकावर बसलेल्या तरुणीचे मोबाईलमध्ये फोटो काढणं चांगलंच महागात पडलेलं दिसून आलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपनगरीय रेल्वेतून प्रवास करताना एका रंगेल वृद्धाने समोर बसलेल्या बाकावरील तरुणीचे मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा सपाटा लावला होता. ही गोष्ट त्याच्या आजूबाजूला बसलेल्या काही तरुणांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्या रंगेल वृद्धाला याचा जाब विचारला. तसेच रेल्वे पोलिसालाही बोलावून घेतले. मात्र या वृद्धाने शेवटपर्यंत गुन्ह्याची कबूली दिली नाही. शेवटी रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा