विलेपार्ल्यात देव गेले चोरीला

 vile parle
विलेपार्ल्यात देव गेले चोरीला
विलेपार्ल्यात देव गेले चोरीला
See all

विलेपार्ले - जैन मंदिरातून 4 देवांच्या मूर्ती आणि दानपेटीतील 75 हजारांची रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. स्थानिक रहिवासी देवेंद्र शहा यांनी रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास मंदिराचं कुलुप तुटलेलं पाहिलं. त्यामुळे शहा यांनी पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. मंदिरात सीसीटीव्ही कॅमरा नसल्याने चोरांचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र 'परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांचा शोध लावू' असं विलेपार्ले पोलीस ठाण्यातले निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी सांगितलं.

Loading Comments