मुंबई आॅन हायअलर्ट!

पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला नक्कीच घेऊ असं जैश-ए-मोहम्मद या संघटनेने जाहीर केलं होतं. त्यातच पुण्यातून बांगलादेशच्या एटीबी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या राज मंडल याला पुणे एटीएसने अटक केली आहे.

मुंबई आॅन हायअलर्ट!
SHARES

देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे. अहमदनगरमध्ये कुरिअर कंपनीच्या पार्सलमध्ये झालेला स्फोट आणि पुण्यात बांगलादेशच्याू 'एटीबी' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या राज मंडल याच्या अटकेनंतर राज्यातील प्रमुख शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळेच मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


दहशतवाद्याला अटक

पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला नक्कीच घेऊ असं जैश-ए-मोहम्मद या संघटनेने जाहीर केलं होतं. त्यातच पुण्यातून बांगलादेशच्या एटीबी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या राज मंडल याला पुणे एटीएसने अटक केली आहे.पुणे एटीएसने केली अटक

कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या संघटनेकडून प्रेरणा घेत, बांगलादेशातील दहशतवाद्यांनी एटीबी ही संघटना बनवली. ही संघटना इंडियन मुज्जाहिदीन पेक्षाही घातक असल्याचं म्हटलं जातं. या संघटनेचा दहशतवादी राज मंडल हा महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून लपून बसला होता. पुण्यातील एका बांधकाम साईटवर तो सुपरवायजर म्हणून काम पहायचा. याबाबतची माहिती आयबीला मिळाल्यानंतर पुणे एटीएसने त्याला अटक केली.


बांगलादेशींना अटक

मंडल हा बांगलादेशी दहशतवाद्यांना भारतात आणण्यास मदत करायचा. तसेच भारतात या दहशतवाद्यांची ओळख लपवण्यासाठी त्यांना बनावट भारतीय ओळखपत्र (उदा. आधारकार्ड, आणि इतर) कागदपत्रे मिळवून द्यायचा. मंडलच्या अटकेनंतर त्याच्या संपर्कात असलेल्याची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. नुकतीच एटीएसने मुंबईसह नवी मुंबईत ओळख लपवून बसलेल्या बांगलादेशींना अटक केली आहे.

राज मंडल याच्या अटकेनंतर भारतातील प्रमुख शहरांमध्ये घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शहरातील हॉटेल्स, मॉल्स, मंदिर, गर्दीची ठिकाणे येथील सुरक्षा मुंबई पोलिसांनी वाढवली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा