• वडाळ्याच्या खाडीत सापडला अज्ञाताचा मृतदेह
  • वडाळ्याच्या खाडीत सापडला अज्ञाताचा मृतदेह
SHARE

वडाळा - वडाळ्याच्या न्यू लोढा कंन्स्ट्रक्शन समोरील खाडीतील नाल्याची सफाई सुरु असताना एका अज्ञाताचा मृतदेह सापडल्याची घटना वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

या अज्ञात इसमाचा कमरेखालील भाग सडलेल्या अवस्थेत होता. त्याच्या उर्वरित शरीराचा शोध वडाळा टीटी पोलीस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वडाळा-चेंबूर रोडवरील वडाळ्याच्या खाडीलगत काँक्रीट नाला बांधण्याचे काम सूरु असून त्यानिमित्त तरंगणाऱ्या जेसीबीच्या साहाय्याने खाडीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

बुधवारी सायंकाळी गाळ काढण्याचे काम सुरु असताना एका अज्ञात इसमाचा कमरेखालील भाग गाळात फसल्याचे जेसीबी चालक राजेश सुदाम निशादला दिसला. त्याने तात्काळ काम थांबवून वडाळा टी टी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या आणि तो अर्धवट मृतदेह तात्काळ बाहेर काढून ताब्यात घेतला. वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे आणि एसीपी अशोक सातपुते यांना कळवले. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या