जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांची ८ तास ईडीकडून चौकशी

परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत त्यांचा जबाब गुरूवारी नोंदवला.

जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांची ८ तास ईडीकडून चौकशी
SHARES

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी रात्री उशिरा जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. एका ट्रॅव्हल कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. संबंधिक कंपनीने गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावर ४६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत त्यांचा जबाब गुरूवारी नोंदवला. गोयल स्वतः ईडी कार्यालयात आले होते. 

हेही वाचाः-​ मध्य, पश्चिम रेल्वेने भंगारातून कमविले ८१० कोटी​​​

यापूर्वी गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले होते. २0१४ मध्ये करण्यात आलेल्या या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले होते. तसेच गोयल यांच्या परदेश दौर्‍यांवरही बंदी घालण्यात आली होती. परंतु त्यानंतर न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. १९९२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या बोर्डावरून नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिला होता. नरेश गोयल चेअरमन पदावरुनही पायउतार झाले होते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळले होते. १७ एप्रिल रोजी जेट एअरवेज पूर्णपणे ठप्प पडली.

हेही वाचाः- ​नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधले​​​

ईडी कार्यालयात गुरूवारी स्वतः गोयल हे चौकशीसाठी हजर राहिले होते. तब्बल ८ तासाहून अधिक वेळ त्यांची ईडीने चौकशी केली. चौकशीतली कुठलीही माहिती अद्याप बाहेर आलेली नसली. तरी या गैरव्यवहार प्रकऱणात गोयल पती-पत्नींचा पाय खोलपर्यंत रूतला असल्याचे आता स्पष्ठ झाले आहे. लवकरच या प्रकरणात गोयल यांच्या पत्नींना चौकशीसाठी ईडी बोलवण्याची शक्यता आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा