बंदी बनवून केली मारहाण

  Powai
  बंदी बनवून केली मारहाण
  मुंबई  -  

  ज्वेलरीचे दुकान बंद करून घरी जात असलेल्या मालक आणि त्याच्या सहकाऱ्याला पाच अज्ञात आरोपींनी बंदी बनवून मारहाण केल्याची घटना पवईमध्ये घडली. पवई पोलिसांनी त्या अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी स्थानिक व्यापारी जितिष परमार हे ज्वेलरीचे दुकान बंद करून त्यांच्या सहकारी प्रकाश सिंह याच्यासोबत घरी जात होते. पण जसे ते एल अॅण्ड टी जंक्शनवर पोहचले तोच काही अज्ञातांनी घेराव घालत परमार आणि सिंह यांना बंदी बनवले. त्यानंतर कारमध्ये बसवून त्यांना ठाण्याच्या दिशेला नेऊ लागले. त्याच वेळी घोडबंदर रोडवर उतरवत या दोघांना मारहाण करू लागले. पण जेव्हा त्यांच्याकडून कोणताही मुद्देमाल मिळाला नाही तेव्हा त्या दोघांना रस्त्यावर जखमी अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी पाच फरार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पीडित व्यक्तींच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना मुंबईच्या बाहेर नेत होते. घोडबंदरच्या कृष्णा ढाब्यावर आरोपींनी परमार आणि सिंह या दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. सध्या पोलिस घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्हीचा तपास करत आहेत. काही घटनेच्या संदर्भात पोलिस काही संशयितांकडे विचारणा करत आहेत. पण अद्याप यामध्ये कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.