जान्हवी कुकरेजा प्रकरण: शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा


जान्हवी कुकरेजा प्रकरण: शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा
SHARES

मुंबईच्या खार परिसरात नववर्षाच्या रात्री पार्टीमध्ये झालेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणात शवविच्छेदनाचा अहवाल  समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये जान्हवीच्या शरीरावर ४८ जखमा आढळून आल्या आहेत. मात्र तिच्यावर कोणतेही लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं नाही. यामध्ये तिच्या कवटीला झालेल्या जखमेचाही समावेश आहे. या रिपोर्टमुळे तिच्या या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः- नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक

मुंबईतील खार  परिसरात असणाऱ्या भगवती हाइट्स या इमारतीत नववर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवी कुकरेजा या १९ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी जान्हवीचा बॉयफ्रेंड श्री जोगधनकर आणि जुनी मैत्रिण दिया पडाळकर यांना अटक केली होती. या हत्या प्रकरणातील प्राथमिक माहितीनुसार जान्हवीनं दोन्ही आरोपींना अश्‍लील कृत्य करताना पाहिलं होतं. यानंतर या तिघांमध्ये भांडण सुरू झालं. या भांडणानंतर जान्हवी रक्ताच्या थारोळ्यात इमारतीच्या खाली आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असता.  वांद्रे न्यायालयानं आरोपींना १४ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- मुंबईत सर्व बोर्डाच्या परीक्षा घेण्यास मंजुरी

खार पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी  पुन्हा एकदा क्राईम सीन तयार केला होता. मात्र अजूनही त्यांना हत्येचा उद्देश सिद्ध करता आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींच्या रिपोर्टच्या आधारे घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांची पडताळणी केली आहे. “आम्ही सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणातला आरोपी श्री जोंधळेकरनं जान्हवीचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्याजवळ केला होता,’’ अशी माहिती खार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गजानन कडबुळे यांनी दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा