मजामस्तीसाठी लुटले 28 लाख!

जोगेश्वरी- मौजमजेसाठी एटीएममधून 28.5 लाख रुपये चोरणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रितेश बर्गे आणि जगदीश पटेल अशी या आरोपींची नावे असून, त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि मुंबईतून पोलिसांनी अटक केली. या दोघांनी 13 मार्चला रात्री जोगेश्वरी येथील एसआरपीएफ कॅम्पच्या बाहेर असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फो़डून सुमारे साडे 28 लाख रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर हे दोन्ही आरोपी मजामस्ती करण्यासाठी गोव्याला गेले. नंतर हे दोघेही सिंधुदुर्गमध्ये आपल्या गावी गेले. मात्र जेव्हा पोलिसांना या चोरीचा सुगावा लागला तेव्हा पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या. यातील एक आरोपी हा ओला कंपनीची गाडी चालवतो. दरम्यान पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments