धारावीत कबड्डीपटूला क्रिकेटच्या स्टंपने मारहाण करत हत्या

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

धारावीत कबड्डीपटूला क्रिकेटच्या स्टंपने मारहाण करत हत्या
SHARES

मुंबईतील धारावी परिसरात २६ वर्षीय कबड्डीपटू विमलराज नाडरची क्रिकेटच्या स्टंपने मारहाण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

विमलराजच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले असून न्यायाची मागणी करत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्याचा घेराव केला. खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

िमलराजच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, हत्येत क्रिकेट स्टंपशिवाय धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विमलराज आणि आरोपीमध्ये जुने वैर होते. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विमलराज यांच्या घराबाहेर तीन ते चार जण जमले आणि त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली.

विमलराजला न्याय देण्याची मागणी

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तपास करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले असून त्यात तीन जण गुन्हा केल्यानंतर पळून जाताना दिसत आहेत. या प्रकरणातील तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. विमलराजच्या हत्येनंतर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आणि न्यायाची मागणी करू लागले.

पोलिसांनी आश्वासन दिले

आंदोलकांनी धारावी पोलीस ठाण्याचा घेराव करून घोषणाबाजी केली. स्थानिकांची गर्दी पाहून पोलिसांनी मात्र त्यांना शांत केले आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.हेही वाचा

तब्बल 600 मुलींना पाठवले अश्लील फोटो आणि व्हिडिओ, पोलिसांकडून अटक

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा