Exclusive ‘फिल्मी स्टाईल’ने तोतया NIA उपायुक्ताने व्यापाऱ्याला लुटले


Exclusive ‘फिल्मी स्टाईल’ने तोतया NIA उपायुक्ताने व्यापाऱ्याला लुटले
SHARES

मुंबईतल्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याची गाडी दिवसा ढवळ्या रस्त्यात अडवून NIA चा उपायुक्त असल्याचे सांगून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  कारवाई न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे २ कोटी रुपये खंडणी मागितली होती. तडजोडी अंती व्यापाऱ्याने आरोपींना २५ लाख रुपयेही दिले. मात्र आरोपींच्या वाढत्या मागण्यांना कंटाळून अखेर व्यापाऱ्याने पोलिसांची मदत घेतली. या गुन्ह्यात एनआयएचे खोटे ओळखपत्र व कागदपत्रांचाही आरोपींनी वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोअर परळ येथील अविघ्न पार्क या आलीशान टॉवरमधील रहिवासी आहेत. ते लालबाग येथील भारतमाता जंक्शन येथून जात असताना दोन दुचाकी त्यांच्या गाडी समोर आडव्या घातल्यात त्यातील एका आरोपीने तक्रारदारांच्या गाडीत प्रवेश करून त्यांची चावी काढून घेतली.केला. दर दुस-याने गाडीची चावी काढून घेतली. तिस-या व्यक्तीने आपण एनआयएचा उपायुक्त असल्याचे सांगून तक्रारदार व्यापा-याविरोधात तक्रार असल्याचे सांगितले. त्याला घाबरवण्यासाठी आरोपींनी ओळखपत्रे व त्यांच्याकडील कागदपत्रे दाखवून तक्रारदार यांच्या घरावर व दुकानावर छापा टाकणार असल्याची धमकी दिली. तसेच याप्रकरणी तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली. तसेच गुन्हा दाखल करायचा नसेल, तर दोन कोटी रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या व्यापा-याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर बरीच धमकी दिल्यानंतर आरोपींनी तडजोडी अंती २५ लाख रुपये स्वीकारण्यास होकार दिला. त्यानुसार तक्रारदाराने तोतया एनआयए अधिका-यांना २५ लाख रुपयेही दिले.

याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तक्राराने याप्रकरणी काळाचौकी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी कलम १७०,१७१,४१९,४२०,४६५, ४६७,४६८,४७१,४७४,३८५,३९२,३४१,१२०(ब)भा.द.वी अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी राजेश बन्सी पवार व विजय सिंग उर्फ महेश पंक्चरवाला याला अटक केली आहे. दोघेही सध्या न्यायलयीन कोठडीत असून पोलिस आरोपींचा एका साथीदाराचा शोध घेत आहेत. यातील विजय सिंग हा तोतया एनआयए उपायुक्त असल्याचे सांगितले होते. इतर पवारसह त्याचा साथीदार तक्रारदाराच्या गाडीत शिरला होता. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा