रेल्वे दरोडेखोरांचा पर्दाफाश

मुंबई - पोलिसांच्या तावडीत असलेली ही तीच टोळी आहे, जिनं रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना घाबरवून सोडलं होतं. रात्री अपरात्री ही टोळी ट्रेनमध्ये चढायची आणि त्यांनतर चाकू सुऱ्याचा धाक दाखवून प्रवाशांना लुटायची. 20 डिसेंबरच्या रात्री या टोळीनं पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये चाकू सुऱ्याचा धाक दाखवून कित्येक प्रवाशांना लुबाडलं होतं आणि त्यानंतर चेन खेचून गाडी थांबवून रात्रीच्या अंधारात हे चोर गायबही झाले होते.

Loading Comments