वन अबोव्ह पबच्या मालकांवर तिसरा गुन्हा


वन अबोव्ह पबच्या मालकांवर तिसरा गुन्हा
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवानंतर पोलीस अटकेत असलेल्या वन अबोव्ह पबचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी अाणि अभिजित मानकर यांच्यावर शुक्रवारी पोलिसांनी तिसरा गुन्हा नोंदवला. कागदपत्रांची पडताळणी करत असताना, कर्मचाऱ्यांचा लाखो रुपयांचा प्राॅव्हिडंट फंड न भरल्यामुळे हा गुन्हा दाखल केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.


प्राॅव्हिडंट फंडच भरला नाही

कमला मिल कंपाऊंडमधील अागीनंतर वन अबोव्हला देण्यात अालेल्या प्रत्येक परवानगी आणि कागदपत्रांच्या पडताळणीचे काम सुरू सुरू असताना वन अबाेव्ह पबमध्ये काम करणाऱ्या १०० हून कर्मचाऱ्यांचा १० लाखांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मालकांकडून भरण्यात आलेली नाही. प्रॉव्हिडंट फंड निरीक्षक तुषार शरद गुजराती यांच्या निदर्शनास ही बाब अाली. तुषार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तीनही भागीदार क्रिपेश संघवी, जिगर संघवी व अभिजीत मानकर यांच्याविरोधात भादंवि ४०९, ४०६ ३४ या कलमांतर्गत संगनमत करून विश्वासाने सोपवलेल्या रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.


सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा

याआधी तीन मुख्य आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि पालिकेच्या अनधिकृत बांधकामाबद्दलच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. या तिघांवरील हा तिसरा गुन्हा असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अहमद पठाण यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा