करियाला न भेटताच हरभजनने काढला पळ


करियाला न भेटताच हरभजनने काढला पळ
SHARES

कमला मिल कंपाऊड आग प्रकरणातील आरोपींना आश्रय देणाऱ्या विशाल करियाला क्रिकेटपट्टू हरभजन सिंग भेटायला गेल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. गुरूवारी रात्री उशिरा हरभजन जुहूस्थित रिव्हिएरिया अपार्टमेंटमध्ये बुकी विशाल करियाला भेटायला गेला होता. विशालचे क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांसोबत चांगले संबंध असल्याची आधीपासूनच चर्चा आहे. त्यातच हरभजनला पाहताच चर्चांना उत आला.


टीकेच्या भीतीने

क्रिकेटपटू हरभजन सिंग विशालला भेटायला आल्याची खबर वाऱ्यासारखी पसरताच मीडियाने हरभजनच्या गाडीला गराडा घातला. उपस्थित मीडियाने हरभजनला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र या भेटीतून उलट सुलट चर्चा सुरू होऊन टीकेचा भडीमार सहन करावा लागेल, हे लक्षात आल्यानंतर करियाला न भेटताच त्याच्याशी फोनवर संपर्क साधून हरभजनने तिथून पळ काढला.



करिया जवळचा मित्र

मागील १० वर्षांपासून हरभजन आणि विशाल एकमेकांंचे जवळचे मित्र आहेत. हरभजनने विशाल सोबतचा २०१६ मधला एक फोटोही शेअर केला होता. दरम्यान, एका प्रकरणात क्रिकेटवरील सट्टयात सहभागी असल्याचा आरोपही विशालवर ठेवण्यात आला होता. मात्र अद्याप याप्रकरणी त्याच्यावरील कोणतीही तक्रार दाखल झालेली नाहीये. कमला मिल कंपाऊड आगीत आरोपींना आश्रय देण्यावरून पोलिसांनी करियावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली होती. मात्र करियाने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्याचा जामीन मंजूर झाला आहे.



हेही वाचा-

कमला मिल आगप्रकरणी विशाल करियाला पोलिस कोठडी

कमला मिल आगप्रकरणी विशाल कारियाच्या सीबीआय चौकशीची अामदार नितेश राणे यांची मागणी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा