कमला मिल आग: वन अबोव्हच्या मॅनेजर्सना न्यायालयीन कोठडी


कमला मिल आग: वन अबोव्हच्या मॅनेजर्सना न्यायालयीन कोठडी
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील आगीप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केलेल्या वन अबाेव्हच्या केविन बावा, लिस्बन लोपेज या दोघा मॅनेजरला न्यायालयाने मंगळवारी २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस चौकशीत या दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस या इमारतीमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन-अबोव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी २९ डिसेंबरला रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये १४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आग लागली त्या रात्री दोघंही तिथं हजर होते. या आगीत मृत पावलेल्यांमध्ये वन अबाेव्हच्या एका कर्मचाऱ्याचाही सहभाग होता. वन अबोव्ह पबची जबाबदारी या दोन्ही मॅनेजरवर होती. आग लागली त्यावेळी पबमध्ये अग्निसुरक्षा प्रतिबंधक उपाय नसल्याचंही पुढे चौकशी अहवालात निष्पन्न झालं.

आग लागल्याचं वृत्त कळाल्यानंतर पबमधील कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम पळ काढल्याचं म्हटलं जात होतं. त्यानुसार या दोघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. मात्र पोलिसांकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचं या दोन्ही मॅनेजरच्या वकिलांनी केले. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याने चौकशीसाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने या दोघांना ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.



हेही वाचा-

कमला मिल आग: प्रत्येक दोषीवर कारवाई करा, माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची याचिका

कमला मिलचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा