कमला मिल आग: अग्निशमन अधिकाऱ्यासह दोघांना अटक


कमला मिल आग: अग्निशमन अधिकाऱ्यासह दोघांना अटक
SHARES

कमला मिल कंपाऊंड आग प्रकरणाचा अहवाल मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केल्यानंतर या प्रकरणात आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये कमला मिल कंपाऊंडचा पार्टनर, अग्निशमन दलाचा निरीक्षक आणि हुक्का कंत्राटदाराचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कमला मिल कंपाऊंड आगीचा अहवाल नुकताच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. या अहवालात कमला मिलमधील अनेक बेकायदा बांधकामांना कमला मिल कंपाऊंडचा पार्टनर रवी सूरजमल भंडारी यांनी परवानी दिल्याचं पुढे आलं होतं. तर अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनी चुकीचे फोटो सादर करत तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर ज्या हुक्का पार्लरमुळे ही आग लागली. त्या हुक्का पार्लरचं कंत्राट हे उत्कर्ष पांडे याला देण्यात आल्याचं पुढे आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या तिघांना अटक केली. या तिघांवर रविवारी हॉलिडे कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

आतापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यात 10 आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारीच पोलिसांनी वन-अबोव्हच्या तिन्ही मालकांवर कर्मचाऱ्यांचे प्रॅव्हिडंट फंड न भरल्याप्रकरणी तिसरा गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यात अन्य जणांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिस वर्तवत असून त्या दृष्टीकोनातून पोलिस तपास करत असल्याचं अतिरिक्त सह पोलिस आयुक्त जयकुमार यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा