कंगना रणौतच्या बॉडीगार्डला मुंबई पोलिसांकडून अटक

कुमारने आई आजारी असल्याचं खोटं कारण सांगून एका ब्युटिशिअनकडून ५० हजार रुपये घेतले होते. बरेच दिवस त्याच्याशी काही संपर्क न आल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

कंगना रणौतच्या बॉडीगार्डला मुंबई पोलिसांकडून अटक
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) च्या बॉडीगार्डला मुंबई पोलिसांकडून (mumbai npolice) अटक (arrest) करण्यात आली आहे.  कुमार हेगडे (kumar hegde) असं त्याचं नाव आहे. बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली आहे. डी. एन. नगर पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कार, शारिरिक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

कुमारने आई आजारी असल्याचं खोटं कारण सांगून एका ब्युटिशिअनकडून ५० हजार रुपये घेतले होते. बरेच दिवस त्याच्याशी काही संपर्क न आल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर डीएन नगर पोलिसांनी त्याचं गाव गाठलं. त्याला अटक करण्यात आली तेव्हा तो त्याच्या लग्नाची पत्रिका वाटत होता. 

आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून ब्युटीशयन महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ब्युटीशियनने दिलेल्या जबाबानुसार, आरोपीसोबत ८ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपीनं जून महिन्यात लग्नाचा प्रस्ताव ठेवला. महिलेने तेव्हा त्याला होकार दिला होता. त्यानंतर आई आजारी असल्याचं सांगून कुमार कर्नाटकला निघून गेला. तसंच त्याने तिच्याकडून आईच्या उपचारासाठी पैसे हवेत असं सांगून ५० हजार रुपये घेतले. पण त्यानंतर तो एकदाही संपर्कात आला नाही, असा आरोप महिलेने केला आहे. तसंच लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यावर लैगिक अत्याचारही केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कुमारवर कलम ३७६, ३७७ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



हेही वाचा -

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा