देशी दारूच्या 10 भट्ट्या उध्वस्त

  मुंबई  -  

  देशी दारूची अनधिकृतरित्या विक्री करणाऱ्या कर्जतच्या मडूवाडी गावातल्या 10 भट्ट्या पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत विषारी नवसागरापासुन तयार केलेली 5 हजार 700 लीटर देशी दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. 

  या भट्टीत तयार होणारी देशी दारू मोठ्या प्रमाणात कर्जतसह खंडाळातल्या आसपासच्या परिसरात पाठवली जात होती. गुप्त सूचनेच्या आधारावर कर्जत पोलिसांनी दुर्गम भागातल्या 15 किमी अंतरावरपर्यंत पायी प्रवास करून ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून 7 आरोपी अद्याप फरार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.