बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा आरोपी पोलीस कॉन्स्टेबल


बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा आरोपी पोलीस कॉन्स्टेबल
SHARES

वर्सोवातल्या घोडबंदर रोड येथे बांधकाम व्यावसायिकाच्या खूनाचा आरोपी चक्क पोलीस कॉन्स्टेबल असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

बुधवारी घोडबंदर रोड वर्सोवाच्या कच्च्या रस्त्यावर पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या मुस्तफा नझिर शेख उर्फ बबलू (34) यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात पोलीस नाईक असलेल्या मुश्ताक अब्दुल मुलानी (38) आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे.


का केली व्यावसायिकाची हत्या?

पोलीस नाईक मुश्ताक आणि मुस्तफा हे दोघे बांधकाम व्यावसायत भागीदार होते. मिळालेल्या माहितीप्रमाणे मुस्तफाने मुश्ताक यांच्याकडून पैसे घेतले होते. मात्र हे पैसे परत करण्यास मुस्तफा तैयार नव्हता. पैशाच्या देवाण-घेवाणीतून दोघांमध्ये वाद वाढत गेला. याच कारणावरून मुस्तफाची हत्या करण्यात आली.

मंगळवारी पोलीस नाईक मुश्ताकने मुस्तफाला आपल्या घरी नेले आणि त्याच्या पत्नीला पैसे आणण्यास सांगितले. दरम्यान मुश्ताक आणि त्याच्या भावाने मुस्तफाचे हात-पाय बांधून त्याला जबर मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह हा घोडबंदर ते वर्सोवा दरम्यानच्या कच्च्या रस्त्यावर फेकून दिला.

मुश्ताकचा शोध घेणाऱ्या काशिमिरा पोलिसांना त्याचा मृतदेह सापडताच त्यांनी तात्काळ हत्येचा गुन्हा नोंद करत पोलीस नाइक मुश्ताक अब्दुल मुलानी आणि त्याचा भाऊ मुनीर या दोघांना अटक केली असून दोघांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा