केदारनाथ सिनेमात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

केदारनाथ या सिनेमाच्या वितरणाचे हक्क देण्याच्या नावाखाली १६ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी क्रिआर्ज इंटरटेन्मेंटचे कार्यकारी सहाय्यक अल्ताफ हुसेन यांना शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

केदारनाथ सिनेमात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
SHARES

प्रदर्शनापूर्वीच नावावरून अडचणीत आलेला बहुचर्चित केदारनाथ सिनेमा पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या वितरणाचे हक्क देण्याच्या नावाखाली १६ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी क्रिआर्ज इंटरटेन्मेंटचे कार्यकारी सहाय्यक अल्ताफ हुसेन यांना शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. याआधीही सिनेनिर्माता वासू भगनानी यांच्या तक्रारीवरुन क्रिआर्जच्या प्रमुख प्रेरणा अरोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.  


गुंतवणूक करार

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या केदारनाथ या सिनेमाने बाॅक्स आॅफिसवर ५८ कोटी रुपयांच्या आसपास गल्ला जमवला. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत हे दोघेही या सिनेमान प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमासाठी क्रिआर्ज इंटरटेन्मेंटचे प्रेरणा अरोरा, अर्जुन उर्फ निमित कपूर, दिग्दर्शक प्रोतिमा अरोरा, अन्वर अली आणि कार्यकारी सहाय्यक अल्ताफ हुसेन यांनी २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये गाॅथिक इंटररटेन्मेंट लिमिटेड सोबत गुंतवणूक करार केला होता.


वितरणाचे अधिकार डावलले

त्यानंतर ८ डिसेंबर, २०१७ मध्ये याच सिनेमासाठी वासू भगनानी याच्या पूजा फिल्म कंपनी तसंच १७ जानेवारी, २०१८ मध्ये पद्मा इस्पात या कंपनीशी करार करण्यात आला. करारा अंतर्गत या कंपन्यांनी सिनेमात गुंतवणूक केली होती. परंतु ठरलेल्या करारानुसार क्रिआर्जकडून या सह गुंतवणूकदार कंपन्यांना सिनेमाच्या वितरणाचे अधिकार देण्यात आले नाहीत.


आश्वासन देऊनही पैसे नाहीत

याबाबत तक्रारदार आणि पद्मा इस्पात कंपनीचे संचालक अनिल गुप्ता यांनी क्रिआर्ज कंपनीच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर हुसेन यांनी गुंतवलेल्या रकमेपैकी २ कोटी रुपये परत करण्याची तयारी दर्शवली. तसंच तक्रारदार गुप्ता यांना पेमेंट करत असल्याचे खोटे युटीआर क्रमांक व्हॉट्‌सअॅपवर पाठवले. मात्र प्रत्यक्षात बँकेत पैसे जमा करण्यात आले नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर गुप्ता यांनी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


मोठी फसवणूक

या गुन्ह्यात ३ कोटीपैक्षा अधिक रकमेची फसवणूक असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ६६ कोटी २७ लाख रुपये असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यांमध्ये जमा झाली आहे. ती वैयक्तीक वापरासाठीही काढण्यात आल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आहे.

याशिवाय दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेतही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून अल्ताफ हुसेनला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.



हेही वाचा-

लग्नाच्या बेडीतून थेट पोलिसांच्या तावडीत

बेकायदेशीर ऑनलाईन लाॅटरी खेळणाऱ्या आरोपींविरोधात ६०० पानी आरोपपत्र दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा