Advertisement

लग्नाच्या बेडीतून थेट पोलिसांच्या तावडीत

आरोपीने काही दिवसांपूर्वीच टिळकनगर इथं एका महिलेचा मोबाइल हिसकावला होता. सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवली. अजय वांद्रे कोर्टात लग्न करण्यासाठी आला असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टाबाहेरच अटक केली.

लग्नाच्या बेडीतून थेट पोलिसांच्या तावडीत
SHARES
Advertisement

मुंबईतील वांद्रे कोर्टात लग्न करुन सपत्नीक बाहेर पडणाऱ्या चोराच्या वरातीला पोलिसांनी हजेरी लावली. अजय धोटे असं या आरोपीचं नाव आहे. अजय आणि त्याच्या साथीदारांनी काही दिवसांपूर्वीच टिळकनगर इथं एका महिलेचा मोबाइल हिसकावला होता. सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवली. अजय वांद्रे कोर्टात लग्न करण्यासाठी आला असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टाबाहेरच अटक केली.


'अशी' उघडकीस आली चोरी

टिळकनगर परिसरात राहणारी महिला शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास तिच्या घरी निघाली होती. तक्रारदार महिला फोनवर बोलत अमर महल जंक्शन येथून जात इसताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी तिचा मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसात महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला.


पोलिस मागावर

ज्या ठिकाणी महिलेचा चोरांनी मोबाइल हिसकावला होता, त्या ठिकाणी काही अंतरावर असलेले सीसीटिव्ही पोलिसांनी तपासले. त्यावेळी दुचाकी चालवत असलेला सराईत आरोपी अजयची ओळख पोलिसांना पटली. पोलिस अजयच्या मागावर जात त्याच्या घरापर्यंत पोहचले.


तावडीत सापडला

तेव्हा अजय हा लग्न करण्यासाठी वांद्रे कोर्टात गेला असल्याचं त्यांना समजलं. त्यानुसार पोलिसांनी वांद्रे कोर्टाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. अजय लग्न करून कोर्टाबाहेर पडत असतानाच बाहेर पोलिस त्याच्या स्वागताला उभे होते. त्यानंतर लग्नाच्या बेडीतून अजय थेट पोलिसांच्या तावडीत सापडला.हेही वाचा-

बेकायदेशीर ऑनलाईन लाॅटरी खेळणाऱ्या आरोपींविरोधात ६०० पानी आरोपपत्र दाखल

नक्षलवादी कनेक्शन: तेलतुंबडे यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळलीसंबंधित विषय
Advertisement