मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे 'त्या' तरुणाचे प्राण वाचले


मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे 'त्या' तरुणाचे प्राण वाचले
SHARES

पूर्व वैमन्यसातून एका व्यक्तीचे फिल्मीस्टाइलने अपहण करून त्याची हत्या करण्याचा कट मुंबई पोलिसांनी हानून पाडला. पोलिसांनी ६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर मोहम्मद सादीक उर्फ मेंटल नवाब याची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली.  या प्रकरणी आरे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाच जणांना अटक केली.

हेही वाचाः- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत कपात

नालासोपारा परिसरात राहणारा मेंटल नवाब याचे पूर्व वैमन्यसातून आरोपींशी वाद होता. याच वादातून आरोपी ओवेश नभी उल्ला शेख (१८), मोहम्मद फारूख गुलाम रसूल शेख (२१),  सत्यम पांडे (२१), मोनिस पप्पु हसन सय्यद (२०), नेहाल जाकीर खान (३२) यांच्याशी वाद होता. याच वादातून आरोपींनी त्याचे अपहरण करून  हत्या करण्याचा कट रचला. दरम्यान शनिवारी मेंटल नवाब हा आरे काँलनीतील बस क्रमांक ३२ च्या बस स्टाँपवर उभा असताना. आरोपी हे एका रुग्णवाहिकेतून आले. त्यांनी त्याच्याजवळ रुग्णवाहिका थांबवून त्याला चाकूचा धाक दाखवला. मदतीसाठी नवाबने आरडा ओरडा केला. मात्र आरोपींनी नवाबला मारहाण करत जबरदस्ती गाडीत बसवले. तसेच मदतीसाठी येणाऱ्यांवर चाकू रोखून धरला.

हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मुख्यनियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर तातडीने नियंत्रण कत्राकडून पोलिस ठाणे परिसरात नाकाबंदी करण्याच आदेश देण्यात आले. तब्बल ६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून नवाबची सुटका करत, या आरोपींविरोधात ३६४,३९७,३२३, १२० (ब), ३४ भा.द.वीसह ४,२५, भारतीय हत्यार कायदासह महाराष्ट्र पोलिस कायदा ३७(१)(अ)सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवून पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा